मुंबई : कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्याहंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे. थोड्याच वेळात कोळंबकर राजभवनात जाऊन पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबतचा महानिकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश न्यायालयाने दिले आहे. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही न्यायालयाने दिले आहेत. बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत नसल्याचे सांगत राजीमाना दिला आहे. दरम्यान, न्यायालयाने बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.