Monday, September 26, 2022

कार सर्व्हिस सेंटरला भीषण आग; कोट्यवधींच्या गाड्या खाक

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

मुंबईतील पवई परिसरात असलेल्या साकी विहार रोडवर लार्सन अँड टुबरो कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली आहे.यामुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी पोहचले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँकर दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. ही आग इतकी भीषण आहे की, आसपासच्या परिसरात सर्वत्र धुराचे लोट पहायला मिळत आहेत. तसेच धुराचे लोट हे 20 ते 30 फुट उंचावर जाताना सुद्धा दिसून येत आहेत. गाड्या जळून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज या आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन मदत कार्याला उशीर होत आहे.शोरूम मधून मोठं मोठ्या स्फोटाचे आवाज होत आहेत. तर या शोरूममध्ये कोट्यवधींच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या