जळगाव । शहरातील खोटे नगरातील राधिका हॉटेलनजीक भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान अपघातातील जखमी दुचाकीस्वारास जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
हॉटेल राधिका समोर दुचाकी क्रमांक (एमएच १९ टीसी ७५०७) वरील दुचाकीस्वाराला स्कार्पियो कार क्रमांक (एमएच १९ सीएफ ८२८२) ने जोरदार धडक दिली. या धडकते दुचाकीस्वार (नाव गाव पुर्ण माहित नाही) जखमी झाला असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान स्कॉर्पींओ कार चालकाने जखमी तरूणास जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. दरम्यान, तालुका पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहिती घेतली.