बोदवड (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसाळा ग्रामपंचायतीत मनमानी पध्दतीने भोंगळ कारभार सुरू असून कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय कार्यारंभ आदेश नसताना येथे शौचालय बांधकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.त्यामुळे येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक यांनी राज्यात लागू असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केले असून संपुर्ण देशावर कोरोनाचे सावट निमार्ण झाले असतांनाही गावात तथाकथीत ठेकेदारांसोबत संगनमत करून येथील ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सोशियल डिस्टींगचे तीन – तेरा बाजवून येथे शौचालयाचे बांधकाम सुरु केले आहे.त्यामुळे संबधित ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.धक्कादायक बाब म्हणजे येथे कोणत्याही प्रकारचा कामाचा कार्यारंभ आदेश दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाचा विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्वांनी सोशियल डिस्टींगचे पालन करावे असे शासनाचे आवाहन केले आहे.मात्र शिरसाळा येथे काही तथाकथीत ठेकेदार व ग्रामसेवक हे हुकुमशाही पध्दतीने येथे हे काम करीत असल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे गावात हे काम सुरू करण्यात आले असल्याचे सरपंच व काही सदस्य यांना माहित नसल्याची चर्चा सुरू आहे.सुरु असलेल्या कामाठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याने यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेचं सुरु असलेल्या कामाबाबत विविध गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.त्यात सदरचे काम कोणत्या योजनेतून करण्यात येत आहे,त्या हेड खाली निधी मंजूर असल्यास शासनाने किती निधी मंजूर केलेला आहे?सदरच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे की नाही ? लॉक डाऊन दरम्यान सदरचे काम मनमानी पध्दतीने त्याचं बरोबर निकृष्ट पद्धतीने करून शासकीय निधीवर डंल्ला मारण्याचा प्रकार सुरु तर नाही ना?असे गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.