Saturday, January 28, 2023

कार्तिकी ठरली टॉप मॉडेल

- Advertisement -

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नुकत्याच जयपूर येथे झालेल्या एमएमटी ब्रँड अँबेसेडर स्पर्धेत नवी मुंबईतील कार्तिकी अदमाने टॉप मॉडेल पुरस्काराची मानकरी ठरली.

वझे केळकर महाविद्यालयातुन मानस शास्त्राची पदवीधर झालेल्या कार्तिकीला अंतिम फेरीत बाकीच्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत तुझं वेगळेपण काय? हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी ही स्पर्धा जिंकणारच हा आत्मविश्वास मला आहे आणि बाकीच्यापेक्षा हेच माझे वेगळेपण असल्याचे उत्तर कार्तिकीला पुरस्काराकडे घेऊन गेलं.

- Advertisement -

जयपूरमधील प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत देशभरातून १५० हुन अधिक सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धकांतुन पाच जणींची अंतिम फेरीकरता निवड करण्यात आली होती. कार्तिकीच्या या यशाबद्दल ठाण्यातील अंबर इंटरनॅशनल स्कुलमध्ये तिचा गौरव करण्यात आला. त्यावेळी शाळेला संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील मुलं मुलींच्या मिस अंबर आणि फ्रेशर अंबर स्पर्धेकरता कार्तिकीने परीक्षक म्हणून काम पाहिले होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे