Thursday, September 29, 2022

कारसह जळून तरुण शिक्षकाचा मृत्यू; घातपाताचा संशय

- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पारोळा तालुक्यातील वाघरे जंगलात अमळनेर येथील तरुणाच्या कारसह जळून मृत्यू झाल्याची घटना घडली.  याबाबत अधिक असे की अमळनेर येथील एका ३१ वर्षीय तरुणाचा पारोळा तालुक्यातील  चोरवड  रस्त्यावर पारोळा पासून सात-आठ किलोमीटरच्या अंतरावर पोपटनगर गावानजीक  तरुणाच्या मृत्यूदेह कारसह जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

- Advertisement -

- Advertisement -

याबाबत पोलीस पाटील यांनी पारोळा पोलीस स्टेशनला खबर दिल्याने पारोळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, निलेश गायकवाड हे घटनास्थळी वैद्यकीय पथकासह पोहचले या पथकात डॉ. सुनील पारोचे, डॉ. चेतन नाईक हे घटनास्थळी दाखल झाले.

सदर मृत्यूदेह पूर्ण जळाल्याने त्याची ओळख पटने अशक्य होते.  त्यामुळे त्याच्या भ्रमणध्वनीवरून त्याने शेवटच्या केलेला कॉल हा पाचोरा येथील असल्याचे समजले त्यांच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली असता तो तरुण शिक्षक शुभम संजय पाटील (वय ३१, रा.  अमळनेर खोकरपाट) तो अमळनेर येथून पाचोरा येथे आपल्याला  नातेवाईकाकडे आपल्या कार  क्र. एम. एच. १८. डब्लु ४९५६ ने  निघाला होता.  परंतु मध्येच ही दुर्घटना घडल्याने ही आत्महत्याची घातपात असा संशय व्यक्त होत आहे पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या