यावल :- येथून जवळ असलेल्या सांगवी बु. गावाजवळ आज सकाळी प्रवाशांनी भरलेली अॅपेरिक्षा व कारमध्ये विचित्र अपघात होऊन यात ३ जण जखमी झाले आहे. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काही मजूर कामासाठी अॅपेरिक्षाने नांदूरखेडा येथून शहादा येथे जात होते. यावल फैजपूर रस्त्यावर हि रिक्षा आली असता एक भरधाव कारने प्रवाशांनी भरलेल्या अॅपेरिक्षाला टक्कर दिल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. यात ३ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.