कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन जण जखमी

0

बोदवड – तालुक्यातील जुनोनो शिवारातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे फरकांडा मारुती मंदीराचे पुजारी व एक जण आज उजनी- बोदवड रोडवर झालेल्या कारच्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना आहे.

फरकांडा मारुती मंदिराचे पुजारी भरतसिंग शामशिंग पाटील अंदाजे (वय ६५) व त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेले पंढरी दयाराम पाटील (वय ४५) दोन्ही रा.जुनोनो ता.बोदवड असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

आज दुपारी १:३० वाजेच्या सुमारास गंभीर जखमी असलेले पुजारी भरतसिंग पाटील व पंढरी पाटील हे दुचाकी क्र.एम.एच.२८ पी.४७१२ यावरून बोदवड येथे येत असतांना बोदवड कडून उजनीकडे भरधाव वेगाने येत असलेल्या मारूती स्विफ्ट कार क्र.एम.एच.०४,जी.एम.२७०४ ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यांत दोन्ही दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले आहेत.त्यांना उपचारार्थ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी बोदवड पोलिसात कुठलीही प्रकारची अपघाताची नोंद नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.