जळगाव (प्रतिनिधी) : दारू पिण्याची सवय असल्याचे सांगितल्यामुळे शेतमालकाने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून शिरसोली येथील शेतात दोघांनी महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
कलशा राजाराम बारेला व बलशा गंगाराम बारेला (दोघे रा.शिरसोली) अशी आरोपींची नावे आहेत. कलशा यास दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याबाबत शेतमालक ढाके यांना सांगितले होते. त्यामुळे पीडित महिलेच्या सांगण्यावरून त्याला ढाके यांनी कामावरून काढले होते. याचा राग आल्यामुळे मंगळवारी रात्री कलशा व बलशा हे दोघे पीडित महिलेच्या शेतातील घरी गेले होते. त्यानंतर दोघांनी महिलेवर अत्याचार केला. पीडित महिलेला उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

