कापूस विक्रीला प्रारंभ; वेचणी अंतिम टप्प्यात…

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यंदा पाऊस लांबल्यामुळे व नंतर पावसाच्या अतिरेकामुळे खरिप हंगाम हातातून गेला आहे. अशाही परिस्थितीत जिल्ह्यात तूरळक शेतकऱ्यांनी आपले कापूस हे पीक वाचवले. कापूस वेचणीला वेग आला आहे. एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांची वेचणी सुरू असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. मजूर मिळत नसल्याने कापूस वेचणीसाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची मदत घेतली जाते आहे.

कापूस वेचणीच्या कामाचे चांगले पैसे मिळत असल्याने विद्यार्थीही कापूस वेचणीसाठी जात आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्यात कापूस वेचणीला वेग आला आहे. मजूर मिळत नसल्याने बच्चे कंपनीही शेतात कापूस वेचणीसाठी जाते आहे. जिल्ह्यातील तालुक्यातून विविध गावांत कपाशीची लागवड झाली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून बऱ्याच गावांमध्ये कापूस वेचणी चे आता अंतिम टप्प्यात आली  आहे. गेल्यावर्षी पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने न कपाशीची विक्री झाली होती. साडेसात हजार  क्विंटलपासून कपाशीची विक्री होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here