कापूस पीक विमा लवकर मिळावा ; शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

0

पारोळा (प्रतिनिधी) : शेतकरी खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने हैराण झाला होता व तो आज चहुबाजूंनी अडचणीच्या गर्तेत सापडला आहे. पारोळा तालुक्यातील 2019 20 चा खरीप हंगामातील कापूस पीक विम्याची रक्कम विमा कंपनीकडून त्वरित मिळावी व ती रक्कम शेतकऱ्यांच्या पिक कर्ज खात्यात न जमा करता शेतकऱ्यांच्या नावे बचत खात्यात जमा करावी असे आशयाचे निवेदन शेतकरी संघटना पारोळा च्या वतीने तहसीलदार श्री गवांदे यांना देऊन माहितीस्तव कृषी अधिकारी पारोळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव जिल्हाधिकारी जळगाव कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.

पारोळा तालुक्यातील खरीप 2019 20 कापूस उत्पादक पिक विमा पोटी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता अतिवृष्टी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान झाले होते तसेच शासनाच्या निर्दशनास आले होते तशा सूचना विमा कंपनीत दिल्या गेल्या होत्या कृषी विभाग कडून पीक पंचनामे झाले होते परंतु अद्याप पावेतो शेतकऱ्यांना कापूस पीक विमा मिळालेला नाही कापूस पीक विमा लवकर मिळावा असे शेतकऱ्यांकडून भावना व्यक्त होत आहेत.

पारोळा तालुक्यात 12290 शेतकऱ्यांनी पीक विमा सहभाग नोंदवला आहे तर एकूण 13789 हेक्टर क्षेत्रावर पिक विमा घेतला होता. या पिक विमा पोटी शेतकरी हिस्सा 24820875 एवढी रक्कम भरलेली आहे पीक विम्याची संरक्षित रक्कम 496417500 रुपये एवढी आहे अतिवृष्टीने तालुक्यातील खरीप हंगाम संपूर्णपणे वाया गेला होता. 31 मार्च पर्यंत पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावयास हवी होती असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील संघटनेचे प्रवक्ते प्रा भिकनराव पाटील उपस्थित होते.

जळगाव जिल्हा विमा प्रतिनिधी शी फोनवर संपर्क केले असता मुंबईचे विमा कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे सांगण्यात आले आहे व तेथील संपर्क नंबर मागितला असता कार्यालय बंद असल्याची बतावणी केली गेली.
-किशोर पाटील
तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना, पाऱोळा

Leave A Reply

Your email address will not be published.