Saturday, October 1, 2022

कापसाने भरलेला ट्रक उलटला ; १ ठार, ८ जखमी

- Advertisement -

जामनेर  | प्रतिनिधी 

- Advertisement -

शहरातील जळगांव रोडवरील  आय.टी.आय. कॉलनी जवळ कपाशीने भरलेला ट्रक उलटुन भीषण अपघातात १ जण ठार तर ८जण जखमी झाल्याची घटना घडली . सविस्तर वृत्त असे कपाशी ने पुर्ण भरलेला ट्रक क्रमांक MH 28 B 9754 हा ट्रकच्या आत व  टपावर कपाशी भरणारे मजुर घेऊनकी शहराकडे येत असतांना दुचाकीस्वाराला वाचवित असतांना ट्रक उलटला त्यातील मजुर हे बाहेर फेकले गेले . त्यातील समाधान भगवान साबळे रा . जामनेर पुरा वय( ६० ) यांना जबर मार लागुन ते जागीच ठार झाले तर ८ जण जखमी झाले . त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . त्यातील २ जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगांव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . जखमींची नावे पुढील प्रमाणे _ १ )फिरोज खान नवाब खान (वय ४० )रा . जामनेर पुरा २ ) अनिल नामदेव कापसे ( वय ४५) ३ ) युवराज सिताराम कचरे ( वय ५५ ) ४ ) आकाश रामसिंग राजपुत ( वय २१ ) ५ ) गोपाल विष्णु सोनवणे ( वय ४० ) ६ ) प्रकाश शामराव माळी ( वय ४० ) सर्व रा . जामनेर पुरा व ७ ) विलास भागवत चौरे ( वय ५७ ) ८ ) दत्तात्रय शालीग्राम चौधरी ( वय ५५ )रा .टाकळी हे गंभीर जखमी झाले आहे

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या