अमळनेर :- तालुक्यातील बऱ्याच ठकाणी होत असलेला हा कापसाचा काळाबाजार सुरू आहे असे बरेच प्रकार उघळकीस येत असता मात्र त्यांना काही वरिष्ठ पुढारी व नातेसंबंध दाखवून दाबले जातात.
याबाबत शेतकरी हा दिवसरात्र उन्हात राब राबत कापसाच्या एक एक झाडाची आपल्या मुलासारखी निगा राखत देखरेख करत त्याला वाढवतो व दिवसभर उन्हा तान्हात उभा राहून तो एक एक बोंड वेचत आपल्या झोळीत टाकत असतो व त्याचा संग्रह करत व्यापाऱ्यांना विकत असतो.
मात्र काही नालायक व्यापाऱ्यांमुळे माझा अशिक्षित शेतकरी बापाला मोठी झट देत व्यापारी वर्ग त्याला गंडवत ताजा होत आहे यामुळे आज माझा बळीराजा खड्ड्यात जात कर्जाच्या ओझ्याखाली आणखी दाबला जात आहेे.
व्यापारी वर्ग एक गावात तीन भाव करत कापूस मोजतो तसेच मोजते वेळी त्याच कापसाचे दोन भाव करतो व तसेच मोजते वेळी शेतकऱ्याची दिशाभूल करत जादा ओझे वाहून नेऊन काटा करतो तसेच काट्या वरील माप मोजणार मापक हाताच्या चलाखी करत व्यापारी व हमाल यांची देखील मिलीबागत असते तसेच काही काटे देखील फॉल्ट असतात शेतकऱ्यांनकडून कोरडा माल कमी किंमतीत घेऊन तो व्यापारी पाणी मारून जादा भावात विकत असतो अशा नालायक व्यापाऱ्यांना कोरोनाने स्वास्थ करो या बाबत असे काही काळाबाजत आढल्यास याची दखल तात्काळ घेणार व गरीब जनता व शेतकऱ्यांना न्याय देणार तालुक्यात असे काही आढल्यास जनतेने 9890898386 संपर्क साधावा असे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी बातमीद्वारे म्हटले आहे.