- कानळदा येथे युतीच्या सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद
जळगांव दि.17 : – सर्व समाजाला न्याय देऊन जळगांव ग्रामीण मतदार संघात सामान्य जनतेसाठी विकास निधी आणून सर्वांगीण विकास केला गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा हेवा वाटावा असे त्यांचे कार्य आहे.अन्यायाविरुद्ध लढणारा व कार्यकर्त्यांसाठी जीव देणारा व समाज कार्यसाठी वाहून घेणारा नेता म्हणजे गुलाबराव पाटील .काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये मरगळ आली असून दोन्ही पक्ष राज्यातून हद्दपार होणार ,सत्ता शिवसेना- भाजपाचीच येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.विकासाच्या व प्रगतीच्या धनुषयाबाणाला विजयी करून बंडखोर किडे माकोड्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे असे प्रतिपादन आ.प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी कानालदा येथे सभेप्रसंगी व्यक्त केले.
बलून बंधारे व शेती रस्त्याच्या विकासासाठी कटिबद्ध ! गुलाबराव पाटील
मतदार संघात शेतकरी व सामान्य जनता केंद्र बिंदू मानून शेवटच्या घटकापर्यंत 5 वर्षात मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला.खेडी- भोकरी पूलासह पुढिल काळात बलून बंधारे व शेती रस्त्यांच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगून मतदानरुपी कर्जाचे विकासकामांच्या माध्यमातूनऋण फेडण्याचा प्रयत्न करेल असे कानलदा येथील जाहीर गुलाबराव पाटील यांनी सांगितले.यावेळी सुमारे हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
कोळी महासंघातर्फे व गर्जना संघटनेतर्फे गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा
यावेळी महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांना जिल्हा कोळी महासंघातर्फे तसेच गर्जना संघटनां,ओ बीसी फाउंडेशन , रिक्षा युनियन तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.
व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार, जळगाव ग्रामीणचे संपर्कप्रमुख अरविंद नाईक, भाजपाचे सदस्य हर्षल चौधरी, जितू राणे, विजय भंगाळे,राजेंद्र चव्हाण , प्रमोद सोनवणे, सुभाष अण्णा, बालाशेठ,अनिल भोळे ,मनोहर पाटील ,भरत बोरसे, मच्छिंद्र पाटील, वसंत भालेराव,मुस्लीम पंच मंडळाचे महमूद मास्तर, बाळासाहेब माने, मुरलीधर पाटील ,सुरेश पाटील, डॉ कमलाकर पाटील, कैलास चौधरी ,देविदास कोळी अनिल मंडोरे, रामचंद्र बापू,संजू नारखेडे ,सरपंच पुंडलिक सपकाळे ,उपसरपंच विजय भंगाळे पिक संरक्षण सोसायटीचे संचालक यांच्यासह कानळदा – भोकर परिसरातील अनेक पदाधिकारी माहितीच्या पदाधिकारी व ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचेसूत्रसंचालन वासुभाऊ सोनावणे यांनी केले तर आभार जितू सोनावणे यांनी मानले.