कानपूरजवळ पूर्वा एक्स्प्रेसचे १२ डबे रुळांवरून घसरले

0

कानपूर :– उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहे. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. अचानक धावत्या ट्रेनचे 12 डबे घसरल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातात 100 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

हावडाहून दिल्लीला जाणारी पूर्वा एक्स्प्रेस रुमा औद्योगिक वसाहतीजवळून जात असताना कपलिंग तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. जे १२ डबे रुळावरून घसरले त्यात एक पॅन्ट्री कार, एक पॉवर कार तर १० प्रवासी डब्यांचा समावेश आहे. ४ डबे रात्री रुळांवरच पलटल्याची माहिती मिळते आहे. रात्री अडीच 2.30 जिल्हाधिकारी, एसएसपी, 30 अँब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य राबवलं जात आहे. जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या 45 जणांची फौज घटनास्थळी पोहोचली असून, डब्यात अडकलेल्यांना बाहेर काढलं जात आहे. या दुर्घटनेत अद्यापही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.