Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»काकाचा खून केलेल्या फरार संशयीत पुतण्यास अटक
    गुन्हे वार्ता

    काकाचा खून केलेल्या फरार संशयीत पुतण्यास अटक

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 9, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    काही दिवसांपूर्वी  शहरातील आंबेडकर नगर भागातील काकाचा खून करुन फरार झालेल्या संशयीत पुतण्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजु पंडीत सोनवणे असे हत्या झालेल्या काकाचे तर सुरज उर्फ विशाल अनिल सोनवणे (वय 33, रा. आंबेडकर नगर जुने जळगाव) असे अटकेतील संशयीत आरोपी असलेल्या पुतण्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 200/21 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    अटक केलेला संशयीत सुरज हा कोणताही कामधंदा करत नव्हता तसेच तो नेहमी व्यसन करत होता. त्यामुळे त्याचे काका त्याला नेहमी बोलत होते. वेळप्रसंगी ते त्याला मारहाण देखील करत होते. त्यामुळे सुरजच्या मनात काका राजु सोनवणे यांच्याबद्दल राग होता. त्या रागातून संधी साधत ते रात्रीच्या वेळी झोपेत असतांना सुरजने त्यांची हत्या केल्याचे कबुल केले आहे.

    सदर घटना घडल्यापासून सुरज फरार झाला होता. त्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी पथक तयार केले होते. त्या पथकात पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील यांचा समावेश करण्यात आला होता. पथकातील सर्व सहका-यांनी फरार सुरजचा विविध मार्गांनी माग काढला. मुंबई, नवी मुंबई, नाशिक, जळगाव व भुसावळ इत्यादी ठिकाणी फरार सुरजचा मागोवा घेण्यात आला. मात्र तो हाती लागत नव्हता.

    सुरज हा जळगाव शहराच्या भोईटे नगर भागातील रेल्वे मालधक्का परिसरात आला असल्याची माहिती पथकाला समजली. सापळा रचून त्याला शिताफीने अटक करण्यात आली. सुरुवातीला आपली ओळख लपवणा-या सुरजने नंतर आपली ओळख उघड करत आपला गुन्हा देखील कबुल केला. त्याला अटक करण्यात आली. त्याचे काका राजु सोनवणे त्याला मारहाण करत त्रास देत होते. त्यामुळे त्याच्या मनात काकाविषयी राग निर्माण झाला होता. त्या रागातून त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. पुढील तपासकामी त्याल शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

     

     

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif