Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
* नाजनीन शेख *
जळगाव ;- काकर समाज हा गेल्या अनेक वर्षापासून दोरी विणण्याचे काम करत आहे . पण जसा कालानुरूप बदल होत गेला .तसे लोक त्या पारंपरिक व्यवसायापासून वेगळे होत गेले . काहींनी स्वतःच्या व्यवसाय तर काहींनी दुसऱ्याकडे नौकरी करणे पसंत केले . त्यामुळे आधुनिक युगात अनेक मशिनरी आल्याने काकर समाज हा दोरी विणकामांपासून दुरावत गेला असला तरी आजही काही कुटुंब हा पारंपारिक व्यवसाय टिकवून आपल्या कुटुंबीयांचा उदर निर्वाह करीत आहे .
गेल्या तीन पिंढ्यांपासून पारंपारिकरित्या आपला व्यवसाय सांभाळून पिरन कुटुंबीय हे दररोज दोरी विणण्याचे काम सायंकाळपर्यंत दोरी विणण्याच्या कामात गुंतलेले असतात . अवघ्या सहा रुपय किलो प्रमाणे दिवसातून शंभर किलो दोरी तयार करण्याचे काम करीत असतात.
————–पिरन कुटुंबाचा अल्प परिचय ————–
पिरन कुटुंबाचे लहान मोठे सर्वच लोक या कामात गुंतलेले असतात . विशेष म्हणजे या विणकामासाठी मूकबधिर एक भाऊ आणि बहीण आहे शेख जब्बार शेख पिरन आणि जमीला शेख पिरन या दोघी भाऊ बहिणीची नावे असून यातील शेख जब्बार शेख पिरन याचा विवाह झाला आहे . पण बहिण जमीला हि जन्माने मुकी असल्याने तिच्याशी विवाह करण्यास नातेवाईकांकडून प्रतिसाद न मिळाल्याची खंत त्यांच्या कुटुंबियांना आहे .
दरम्यान पिरन कुटुंबीय शासनाकडून काही मदत अथवा व्यवसाय वाढीसाठी बँक अथवा शासनाकडून अद्याप मदत मिळाली नसल्याने अनेकदा चकरा मारल्यावर पदरी निराशा पडली आहे . त्यामुळे इतर काही गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत त्यामुळे आपला पारंपारिक व्यवसाय संभाळण्याला त्यांनी प्राधान्य देऊन हाच पिढीजात व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असल्याचे सांगितले . पावसाळा असो कि हिवाळा असो बाराही महिने हे काम सुरु असते . कापड बनवण्यासाठी जे दोरे लागतात त्यापासून जर कापड तयार होत नसेल तर असा दोऱ्यासाठी टेंडर निघतो आणि टेंडर मिळाल्यानंतर त्यापासून हि दोरीबनविली जाते .