Thursday, September 29, 2022

कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक

- Advertisement -

मुंबई : मुंबईमधील कांदिवली स्टेशनजवळ ट्रक रेल्वे रुळावर आल्याने जोराची धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातत कुणालाही दुखापत झाली नाही. वांद्रे-अमृतसर या रेल्वेला दुपारी साडेबाराच्या सुमारास हा किरकोळ अपघात झाला.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेमार्गावरील कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे लाईनचं काम सुरु आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक मालवाहतूक केली जाते. मात्र आज दुपारी साडेबाराच्या सुमारास, आलेल्या रेल्वेने, या ट्रकला धडक दिली. या धडकेमुळे ट्रकच्या मागील बाजूचं नुकसान झालं आहे. शिवाय रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेल्याने दुभाजकाच्या बॅरिकेट्स तोडून, ट्रक पुढे गेला.

- Advertisement -

- Advertisement -

सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे घटनास्थळी पोलीस आणि अधिकाऱ्यांनी धाव घेत, आवश्यक उपाययोजना केल्या. दरम्यान, रेल्वे लाईनचं काम सुरु असताना, रेल्वेमार्गावर ट्रक कसा आला, यामध्ये कोणाचा हलगर्जीपणा आहे का, याबाबत आता तपास सुरु आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या