भडगाव,दि. 22-
कांदा प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने येत्या रविवारी दि. 24 रोजी रविवारी आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव जाणार असल्याचे प्रहार संघटनेचे पदाधिकार्यांनी गाव माझा न्युज शी बोलतांना सांगितले.गेल्या काही दिवसांपासून कांद्याला भाव मिळत नसून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत त्या पार्श्वभूमीवर प्रहारने गेल्या 26 डिसेंबर रोजी चांदवड येथे मुक्काम मोर्चा आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1 जानेवारी रोजी सहकार मंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक झाली मात्र सरकारने हमीभावासंदर्भात कुठलेही पाऊल उचललेले नाही.त्यामुळे कांदा भावाचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे. त्यानंतर 28 जानेवारी रोजी येवला येथे कांदा उत्पादकांच्या उपस्थितीत संवाद सभा झाली. पुन्हा 16 फेब्रुवारी रोजी सटाणा येथे कांदा उत्पादकांचा मिळावा झाला. याच मेळाव्यात येत्या 24 तारखेला थेट नाशिक शहरातच कांदा परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार येथे रविवारी दि. 24 रोजी दुपारी दोन वाजता होणार्या कांदा परिषदेत शेतकर्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जळगांव जिल्हाप्रमुख विजयकुमार भोसले , सर्व तालुका प्रमुख पदाधिकारी व् सबंध जिल्ह्यातील प्रहार सैनिकानि केले आहे
प्रहार जनशक्ती पक्षाची शेतकरी कांदा समस्येवरील बैठक जळगांव येथे संपन्न
प्रहार जनशक्ती पक्षाची शेतकरी प्रश्नानावर बैठक उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू भाऊ बोडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
मा.आमदार बच्चू भाऊ कडु यांनी उत्तर महाराष्ट्रातील कांदा प्रश्नाबाबत मागील दोन महिन्यांपासून आवाज उठवला असून शेतकर्यांचा आवाज सरकारी दरबारी पोहचावा यासाठी मा.आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड येथे मुक्काम मोर्चा सभा घेण्यात आली होती.उद्या सटाणा जिल्हा नाशिक येथे कांदा प्रश्नावर सभा आयोजित करण्यात आली आहे.
सरकारच्या चुकीच्या धोरणा मुळे कांदा प्रति क्विंटल 100 ते 150 रुपये विकला जात असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्यांचा कांदा उत्पादन व भाव या ज्वलंत प्रश्ननावर 24 फेब्रुवारी 2019 रोजी नाशिक येथे राज्यव्यापी कांदा परिषद घेण्यात येणार आहे. शेतकर्यांच्या कांदा प्रश्ननावर कुंभ मेळावा घेऊन सरकार जागे व्हावे यासाठी उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित रहावे यासाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू भाऊ बोडके यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना आव्हान केले आहे .