कांचननगरातील वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव। प्रतिनिधी 

कांचननगरातील दर्याजवळ राहणाऱ्या सुभाष फुलसिंघ परदेषी (७५) या वृध्दाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री सुभाष परदेसी यांचा सुलगा सागर व  त्याची प्तनी सागच्या खोलीत तर वडील सुभाष हे मधल्या खोलीत झोपले होते. पाहटे तीन वाजेला मुलगा सागर चादर घेण्यासाठी मधल्या खोलीत गेले असता त्यांना वडील सुभाष यांनी दाेरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

हा प्रकार पाहन मुलाने हंबरडा फोडला. रहिवाशांनी शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे गुन्हे शोध पथकातील दिनेशसिंघ पाटील व संदिप पाटील यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मृतदेह उतरवून रुग्णालयात हलविला. वैद्दकीय अधिकारी डाॅ. आहिरे यांनी परदेशी यांना मृत घोषित केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.