चाळीसगाव:-(प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष श्री रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीमध्ये चाळीसगाव तालुका सोशल मीडियाच्या विधानसभा अध्यक्ष पदी येथील अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष श्री अल्ताफ खान जमशेर खान यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .

या नियुक्तीने त्यांचे जळगाव जिल्हा कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष अॅड भैय्यासाहेब संदीप पाटील, सरचिटणीस अजबराव पाटील, चाळीसगाव तालुका काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष आर डी चौधरी यांनी अभिनंदन केले,

