काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देणार : राहुल गांधी

0

नवी दिल्ली : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केलीय. काँग्रेस सत्तेवर आली तर देशातल्या गरीबांना वर्षाला 72 हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.
देशात 20 टक्के गरीब असून त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. देशात भरपूर पैसे असून हे पैसे देणे शक्य आहे असा दावाही त्यांनी केला. ज्यांचं उत्तपन्न 12 हजारांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
5 कोटी कुटुंब आणि 25 कोटी लोकांना या योजनेचा थेट फायदा होईल असा दावाही त्यांनी केला. या आधीही राहुल गांधी यांनी गरीबांना किमान वेतन देण्याची घोषणा केली होती. राहुल गांधी यांच्या या घोषणेमुळे नवी राजकीय चर्चा होणार आहे. या विषयावर तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली असून हे शक्य आहे असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर श्रीमंतांचं लाखो कोटींचं कर्ज माफ करू शकतात तर काँग्रेस गरीबांसाठी हे पैसे का देऊ शकत नाही असा सवालही त्यांनी केला.
मतदानाला काही दिवस राहिले असल्याने राहुल गांधींनी केलेल्या या घोषणेवर आता पुन्हा जोरदार राजकीय होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.