तौफिक शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर | प्रतिनिधी
कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांच्या हत्येने खळबळ माजली आहे. रेश्मा यांनी महिनाभरापूर्वी सोलापुरातील एमआयएम नगरसेवक तौफीक शेख यांच्याविरोधात सादर बाजार पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली होती. तेव्हापासून रेश्मा बेपत्ता होत्या. अखेर त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय.
सोलापुरातील एमआयएमचे शहरअध्यक्ष आणि नगरसेवक तौफीक शेख यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार मागील महिन्याच्या 17 तारखेला देण्यात आली होती. तक्रार दिल्यापासून रेश्मा गायब होत्या. मात्र कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील कोलार येथे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिक शेख आणि रेश्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे तौफिक शेख यांच्या पत्नीने रेश्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि रेश्माने तौफिक शेखच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदन अहवालनानंतर हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी यामागे एमआयएमचे तौफीक शेख यांच्याभोवती संशयाची सुई फिरत आहे.