काँग्रेसच्या वाट्यातील १० मंत्र्यांच्या खाते खातेवाटपावर शिक्कामोर्तब

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले, तरी खातेवाटप आद्यपही जाहीर झालेलं नाही. दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वाट्यातील १० मंत्र्यांच्या खाते खातेवाटपावर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

खातेवाटपाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आज मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर होण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परिवहन किंवा कृषी खातं मिळावं यासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र शिवसेना दोन्ही खाती सोडण्यास तयार नव्हती. अखेर काँग्रेसने एक पाऊल मागे घेतलं आहे. वाटाघाटीत काँग्रेसला बंदरे, खार जमिनी आणि सांस्कृतिक अशी तीन खाती देण्यात आली आहेत. तर राष्ट्रवादीला माजी सैनिक कल्याण, क्रीडा व युवक कल्याण अशी दोन अतिरिक्त खाती देण्यात आली आहेत. तर कृषी आणि परिवहन खाते हे शिवसेनेकडे राहणार आहे.

महाविकास आघाडीत शिवसेनेला 12 मंत्रीपदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 14 मंत्रीपदे व काँग्रेसला 10 मंत्रीपदे असे एकूण 42 मंत्र्यांचे  मंत्रिमंडळ असणार आहे.

काँग्रेसची खातेवाटपाची यादी

बाळासाहेब थोरात – महसूल

अशोक चव्हाण- पीडब्यूडी

नितीन राऊत- उर्जा

अस्लम शेख- बंदरे, मत्यउद्योग, वस्त्रोद्योग

वर्षा गायकवाड- शालेय शिक्षण

के. सी. पाडवी- आदिवासी विकास

अमित देशमुख- वैद्यकिय शिक्षण

विजय वडेट्टीवार- दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन

यशोमती ठाकूर- महिला बालकल्याण विकास

काँग्रेसच्या वाट्यातील 10 मंत्र्यांच्या खाते वाटपाला

Leave A Reply

Your email address will not be published.