बेंगळुरू : काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी बेंगळुरूत पोहोचलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना बेंगळुरूतील अमृताहल्ली पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
Bengaluru: Congress leader Digvijaya Singh sits on dharna near Ramada hotel, allegedly after he was not allowed by police to visit it. 21 Madhya Pradesh Congress MLAs are lodged at the hotel. https://t.co/VSkp7iL5ZW pic.twitter.com/wyPcfvci3f
— ANI (@ANI) March 18, 2020
काँग्रेसच्या बंडखोर सर्व आमदार रमाडा हॉटेलमध्ये थांबलेले आहे. त्यांना भेटण्यासाठी दिग्विजय सिंह हॉटेलमध्ये गेले असता त्यांना पोलिसांनी गेटवरच अडविले. त्यावरून आक्रमक झालेले दिग्विजय सिंह आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोरच ठिय्या आंदोलन केलं. नंतर पोलिसांनी दिग्विजय सिंह आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अटक केली आहे. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी दिग्विजय सिंह यांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, यावेळी आपण उपोषण सुरू केले असल्याचे दिग्विजय यांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, मध्य प्रदेशातील बहुमत चाचणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असून दुसरीकडे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना बहुमत चाचणीला आज सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत.