कहानी एका अपंग मुर्तीकाराची ; गणपती व देव्यांच्या मुर्त्या घडवुन ओढत आहे कुटबियांचा गाडा

0

पाचोरा (नंदकुमार शेलकर) :    पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील रहिवासी राजेंद्र कुंभार हे एका पायाने अपंग असुन  कोणावरही अवलंबून न राहता त्यांनी आपला रोजगार स्वयंम उपलब्ध करून समाजा समोर एक नविन आदर्श निर्माण केला आहे. रविंद्र कुंभार हे गेल्या १५ वर्षांपासून गणेशोत्सवात गणपती मुर्ती व दुर्गोत्सवात देवींच्या मूर्ती बनवुन आपल्या वृध्द आईसह पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवारा सह आपल्या संसाराचा गाडा ओढत आहे.

परंतू यंदा कोरोना महामारीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षी गणेशोत्सव व दुर्गोत्सव या उत्सवाची ओढ सर्वांनाच लागलेली असते. अशीच ओढ कुंभार परिवारालाही लागलेली असतांना कोरोना महामारीने गणेशोत्सवा सोबतच दुर्गोत्सवातही सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे. कुंभार परिवारही या पासुन सुटलेला नाही. कोरोना काळात शासनाच्या निकषांप्रमाणे चार फुटांपेक्षा मोठ्या मुर्त्यांना परवानगी नसल्याने मोठ्या मुर्त्यांच्या तुलनेत लहान मुर्त्यांमध्ये कमी उत्पन्न मिळते. म्हणुन पुन्हा एकदा कुंभार कुटुंबिय आर्थिक विवंचनेत सापडतांना दिसुन येत आहे.

राजेंद्र कुंभार हे एका पायाने अपंग असुन त्यांची वृध्द आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा हे राजेंद्र कुंभार यांच्या खांद्याला खांदा लावून पुन्हा एकदा मोठ्या उमेदीने गेल्या महिनाभरापासून देवींच्या मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत. दुर्गोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवुन ठेपला असतांना दरवर्षी जिल्ह्यातुन श्री गणेशाच्या मुर्ती सोबतच दुर्गोत्सवात देवींच्या मूर्तींची मागणी रविंद्र कुंभार यांचेकडे केली जाते. परंतु यावर्षी मागणी खुपच कमी असल्यामुळे  अपंग रविंद्र कुंभार वृद्ध आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा या परिवारावर आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. याची शासनाने व प्रशासनाने दखल घेवुन आर्थिक मदत उपलब्ध करुन द्यावी अशी रास्त मागणी कुंभार परिवाराने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.