कळमसरा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल प्रस्तुत ‘वाण आरोग्याचं’ शिबीर संपन्न

0

पाचोरा (प्रतिनिधी) : कळमसरा ता. पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा यांच्या सुचनेनुसार  दि.३१ जानेवारी रविवार रोजी राष्ट्रवादी महिला व काँग्रेस डॉक्टर सेल प्रस्तुत “वाण आरोग्याचं” महिलांचे आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले होते.

आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश सचिव वंदना चौधरी यांच्या हस्ते महिला शक्तीच्या उद्धारत्या  राष्ट्रमाता जिजाई व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यामध्ये महिलांच्या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या चाचणी करून मोफत  औषधीचे वाटप ही केले गेले महिलांनी हे शिबिर विविध प्रकारच्या समस्या विषयी असल्याने दोनशेच्यावर व्याधीग्रस्त महिलांनी चाचणी करून औषधी प्राप्त केली त्या साठी जामनेर येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. सुदर्शना सोनवणे, डॉ. प्रशांत पाटील, जामनेर युवक उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष तसेच कळमसरा येथील डॉ. जिवन कटारिया, डॉ. निंबाळकर, डॉ. पृथ्वीराज यांनी मदत केली तर शिबीर यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, शिवाजी देशमुख, दिनकर चौधरी, अशोक पाटील, गणेश वाघ, प्रकाश देशमुख, गणेश पांडव, राहुल पाटील, नाना पाटील, नाना बोखारे, माधव पाटील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या बेबाबाई थोरात, सीता वाघ, अरुणा घुले, रत्‍ना चौधरी, मनीषा हटकर, वैशाली पाटील यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.