कलाकारावर झालेल्या अध्यात्मिक संस्कारांचे प्रदर्शन

0

जळगाव – कलाकारावर घरातून झालेले आध्यात्मिक संस्कार त्यातून कागदावर उमटलेली ही चित्र आहेत. नेहा लुंकड यांचे हे नुसतेच चित्रप्रदर्शन नसून आध्यात्मिक संस्कारांचे प्रदर्शन असल्याचा सूर मान्यवरांकडून उमटला.

शहरातील ज्येष्ट चित्रकार तरुण भाटे यांच्या विद्यार्थिनी नेहा लुंकड यांच्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन शहरातील पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या कलादालनात मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी चित्रप्रदर्शनीचा आस्वाद घेत आपल्या प्रतिक्रिया लोकलाईव्ह कडे व्यक्त केल्या. हे प्रदर्शन 30 मे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

अध्यात्मासह पोट्रेटकडे कल

– अ‍ॅड. सुशिल अत्रे

नेहा यांचा अध्यात्मासह पोट्रेटकडे जास्त कल दिसून येतो. त्यांनी निसर्गचित्र काढावीत. मोठे पोट्रेट काढावे. पेन्सील स्केचसह रंगीत व उत्तमोत्तम चित्र तिच्याकडून निर्माण होवोत. पु.ना. गाडगीळ सन्स यांनी कलादालन उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रतिभावंतांना संधी मिळत आहे.

जहाँगीर गॅलरीत प्रदर्शन व्हावे- दलीचंद जैन

गणपती, साईबाबा, श्रीकृष्ण- राधा यांची चित्रे पाहून नेहा हिचा अध्यात्माकडे जास्त ओढा आहे असे वाटते. कलेशी संबंध नसलेल्या घरात जन्मलेल्या या कलाकाराचे नवल वाटते. तिचे मुंबई येथील जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवावे, अशा सदिच्छा संघपती दलीचंद जैन यांनी व्यक्त केल्या. कलादालनामुळे पु. ना. गाडगीळ सन्सचे जळगावकरांशी दृढ नाते निर्माण झाल्याचा गौरव त्यांनी केला.

कलाकार म्हणून अस्तित्व निर्माण केले- नंदकुमार बेंडाळे अध्यक्ष केसीई

कला ही प्रत्येकात उपजत असते. तिची जोपासना जर घराघरात व्हायला हवी. कलेत आपण जगतो तेव्हा वेगळाच आत्मानंद मिळतो. नेहाचा ओढा आध्यात्मिक वाटतो. कलेचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेतले तर कला ही बुद्धीमत्तेच्या जोरावर जगासमोर प्रगट होवू शकते. नेहाच्या 60 कलाकृतींचे प्रदर्शनात समावेश आहे. प्रसिद्ध कला शिक्षक तरूण भाटे यांचे मार्गदर्शनाखाली नेहाने चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे. या प्रदर्शनाचे मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. सर्वांचे नेहा लुंकड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आभार महेंद्र लुंकड यांनी मानले. यावेळी नेहा लुंकड यांचे स्नेही आप्तेष्ठ शिक्षक उपस्थित होते. सुलेखा लुंकड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

चित्रप्रदर्शन नाही, संस्कारीत प्रदर्शन- भालचंद्र पाटील

र्ी चित्रप्रदर्शन नसून हे संस्कारीत प्रदर्शन असल्याचा गौरव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केला. नेहा यांच्यावर झालेले संस्कार ते चित्रात प्रतिबिंबीत झाले आहेत. मुर्ती दगडात असते फक्त त्यातील अनावश्यक भाग काढून टाकावा लागतो. तिच्यात ते गुण उपजत होते. तरुण भाटे सरांच्या माध्यमातून त्यांना योग्य आकार देण्यात आला. तिचे प्रत्येक चित्रात वास्तव व आत्मा आहे. नेहा ही अबोल असून ती तिच्या भावना,विचार चित्रांतून व्यक्त करते.

Leave A Reply

Your email address will not be published.