Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! नोकरी बदलल्यास आता पीएफप्रमाणे ग्रॅज्युएटीही होणार ट्रान्सफर
    ताज्या बातम्या

    कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! नोकरी बदलल्यास आता पीएफप्रमाणे ग्रॅज्युएटीही होणार ट्रान्सफर

    By March 25, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     मुबई : नोकरदार वर्गासाठी खूप आनंदाची बातमी आहे. भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ प्रमाणेच आता एक नोकरी सोडून दुसरी नोकरी सुरू केल्यास ग्रॅच्युएटी देखील ट्रान्सफर करता येणार आहे. EPF खातं जसं एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर केलं जातं. त्याच पद्धतीनं नोकरदाराच्या ग्रच्युएटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेऊन नियम लागू करण्यात येईल, असं केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.

    सध्याच्या ग्रॅच्युएटीच्या रचनेत बदल करण्याबाबतही केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. यात केंद्र सरकार, कर्मचारी संघटना आणि उद्योग यांच्यातील ग्रॅच्युएटीच्या रचनेत बदल होणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, ग्रॅज्युएटीला सिटीसीचा एक आवश्यक भाग बनविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आणि यासाठी पुढील महिन्यात याबाबत अधिसूचना देखील प्रसिद्ध केली जाऊ शकते.

    सध्या एका वर्षांच्या नोकरीवर १५ दिवसांच्या पगाराइतकी ग्रॅच्युएटी मिळते. त्यात वाढ होऊन ३० दिवसांच्या पगारा इतकी ग्रच्युएटी करण्यात यावी अशी मागणी आहे. पण उद्योगांना हे मान्य नाही.

    कुणाला मिळतो ग्रॅच्युएटीचा लाभ?

    पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी अॅक्ट १९७२ नुसार ज्या कंपनीत एखादा कर्मचारी १० वर्षांपेक्षा अधिक वर्ष काम करतो, त्या प्रत्येकाला संस्थेमध्ये ग्रॅज्युएटीचा लाभ मिळवता येतो. जर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली किंवा सोडली, निवृत्त झाला तर ग्रॅज्युएटीचे नियम पूर्ण केले असतील तर ग्रॅज्युएटीचा लाभ मिळतो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif