कर्नाटक पाठोपाठ गोव्यातही काँग्रेसला खिंडार ; १५ पैकी १० आमदार भाजपात

0

पणजी :  कर्नाटक पाठोपाठ आता गोव्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  गोव्यातील १५ पैकी १० आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे. आधीच कर्नाटकचा पेच सोडवतांना काँग्रेस आणि जेडीएसची दमछाक सुरू असताना आता गोव्यातील या राजकीय भूकंपामुळे काँग्रससमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

गोवा विधानसभेत भाजपा आमदारांची संख्या आता २७ झाली असून स्थिर सरकार झाले आहे.  काँग्रेस पक्षाच्या पंधरापैकी दहा आमदारांनी बुधवारी रात्री काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना आहे.

या दहा आमदारांनी केला भाजप प्रवेश

कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.