कर्नाटकात भाजपचे 7 आमदार कॉंग्रेस-जेडीएसच्या संपर्कात

0

बंगळुरू : कर्नाटकात मागच्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष होताना यात रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता कॉंग्रेसने भाजपला मास्टरस्ट्रोक दिला आहे. कारण भाजपमधील तब्बल 7 आमदार कॉंग्रेस-जेडीएसला आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजपने कॉंग्रेसला धक्का देत काही आमदार आपल्या बाजूने केले होते. पण आता हाच डाव भाजपवर लटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाजपमधील 7 आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. भाजपचे सर्व 105 आमदार सध्या रिसॉर्टमध्ये आहेत. पण विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपचे काही आमदार कॉंग्रेस-जेडीएस सरकारला पाठिंबा देण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या आमदारांना मंत्रिपदासह मोठ्या पदांची ऑफर देण्याची कॉंग्रेसची तयारी असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपने सरकारविरोधात केलेली रणनीती अयशस्वी होते की काय, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यातच कॉंग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असणारे डीके शिवकुमार सरकार कर्नाटकातील सरकार टिकवणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.