पोलीस कर्मचारी जागीच ठार ; चाळीसगाव येथील घटना
जळगाव-चाळीसगाव – सोमवारी सकाळी साडे आठ वाजता धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११वर चाळीसगाव नजीक महामार्गावर
अनिल शालिग्राम शिसोदे (वय ५२) मुळ राहणार डांगरी ता. अमळनेर हे गेल्या तीन वर्षापासून चाळीसगाव वाहतूक शाखेत कार्यरत होते. सोमवारी ते महामार्ग पोलिस चौकी समोर कर्तव्य बजावत असताना धुळे येथून औरंगाबादकडे जाणा-या ट्रकला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, ट्रक चालकाने त्यांना उडवले.
ही घटना चाळीसगाव शहरापासून दक्षिणेला चार किमी अंतरावर असणा-या महामार्ग पोलिस चौकी समोरच घडली. यानंतर ट्रकला काही अंतरावर पाठलाग करुन पकडण्यात आले. चालक मात्र पसार झाला. यावेळी आणखी पाच पोलीस कर्मचारीही येथे होते. अनिल शिसोदे हे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी, आई – वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.