मुक्ताईनगर : तालुक्यातील सातोड येथील तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीला व त्यामुळे झालेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. मोतीलाल रामदास पाटील (वय ४५) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
मोतीलाल पाटील यांच्या मयत वडिलांच्या नावे जवळपास दहा एकर शेती सातोड शेती शिवारात आहे. तर मोतीलाल पाटील स्वत: ची शेती करत होते. त्यांचेवर जवळपास शेतीखर्चासाठी एक लाख ५१ हजार रुपये कर्ज तसेच उसनवारी पोटी एक लाख २५ हजार रुपये इतके कर्ज झाले होते. मोतीलाल पाटील यांनी १४ एप्रिल रोजी आपल्या सातोड शेती शिवारातील शेतातच काहीतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता चार १८ एप्रिल रोजी उपचार घेताना निधन झाले. त्यांचे पश्चात आई मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे.