कर्जबाजारीपणाला कंटाळून भोकर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

0

जळगाव | तालुक्यातील भोकर येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. फुलचंद ताराचंद सोनवणे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, याबाबत तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

फुलचंद सोनवणे यांची स्वतःची 6 एकर शेती आहे. दरम्यान, त्यांनी भोकर विकास कार्यकारी सोसायटी मधून 3 लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जाची फेड होऊ शकत नसल्याने फुलचंद सोनावणे तणावात होते. 15 ऑगस्ट रोजीच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास वयोवृद्ध आईला शौचास जाऊन येतो असे सांगून फुलचंद हे घरातून बाहेर पडले. मात्र एक तास होऊन आपला मुलगा घरी न आल्याने वयोवृद्ध आईने लहान मुलगा राघव सोनवणे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्व नातेवाईकांनी रात्रभर शोधाशोध सुरू केली. दरम्यान आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास तापी नदीच्या काठावर फुलचंद सोनवणे यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.कर्जबाजारीतून आत्महत्या केल्याचे मयताचे पुतणे पुंडलिक सोनवणे यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा प्राथमिक तपास हेड कॉन्स्टेबल लोखंडे आणि पो.ना. संदीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.