करोनाला रोखण्यासाठी शॉपिंग मॉल बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0

जळगाव : देशभरातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक खबरदारी आणि पावलं उचलत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज सर्व शॉपिंग मॉलमधील दुकाने, आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी उद्यापासून (ता.17) सुरू होईल. त्याबाबत पोलिस प्रशासन, महापालिका, पालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत. आदेशाची उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या 38 वर पोहोचली आहे. तर देशात 110 जण कोरोनाबाधित आहेत. याबाबत राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. सर्व खासगी क्‍लासेस, अभ्यासिका, ट्यूशन्सही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचीही अंमलबजावणी होणार आहे. गेल्या शनिवारी राज्य शासनाने 31 मार्चपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या “बंद’चे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी आजपासून सर्व शाळा, महाविद्यालयांनी सुरू केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.