Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»करोनाला रोखण्यासाठी एमर्जन्सी फंड ; भारताकडून १ कोटी डॉलर
    ताज्या बातम्या

    करोनाला रोखण्यासाठी एमर्जन्सी फंड ; भारताकडून १ कोटी डॉलर

    By March 16, 2020Updated:March 16, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. जगभरात १.५ लाखांहून अधिक लोक करोना व्हायरसनं संक्रमित आहेत. भारतातही करोनाबाधित रुग्णांच्या आकड्यानं शंभरी ओलांडलीय. दरम्यान,  करोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-१९ साठी एका एमर्जन्सी फंडचा प्रस्ताव सार्क देशांसमोर ठेवलाय. करोनाला रोखण्यासाठी “सार्क’देशांनी स्वयंप्रेरणेने आपत्कालिन निधी उभारायला हवा, असे सांगून या निधीसाठी भारताकडून 1 कोटी डॉलर देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. भारतानं उचललेल्या या पावलाबद्दल सार्क नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

    कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करताना सार्क सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे तयारी आणि कृती करून यशस्वी झाले पाहिजे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. प्रदेशात कोविड-१९ चा सामना करण्यासाठी सामायिक मजबूतधोरण आखण्यासाठी सर्व सार्क देशांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उद्घाटन करताना ते बोलत होते.

    उत्कृष्ट प्रयत्न करून ही स्थिती कशी होईल, हे सांगता येत नसल्याने आपापल्या दृष्टिकोनांची देवाणघेवाण करणेही सर्वात मूल्यवान गोष्ट आहे, असे प्रधानमंत्री म्हणाले. आतापर्यंत सार्क प्रदेशात कोरोनाचे दीडशेहून कमी रूग्ण आढळले असले तरीही या प्रदेशात जागतिक लोकसंख्येच्या एक पंचमांश लोक रहात असल्याने सावध राहण्याची गरज आहे. कोरोनाच्या प्रसाराशी लढताना भारताचा अनुभव सांगताना प्रधानमंत्र्य़ांनी तयारी करा पण घाबरू नका, हा मार्गदर्शक मंत्र असल्याचे म्हटले आहे.भारताने कोरोना विषाणुच्या समस्येला किरकोळ ठरवले नाही पण उतावीळपणे प्रतिक्रिया देणे टाळले आहे, असेही मोदी म्हणाले. जानेवारीच्या मध्यापासूनच भारताने देशात येणाऱ्यांची तपासणी करण्यास सुरूवात केली आणि प्रवासावर निर्बंधही घातले. एका नंतर एक निर्णय घेण्याची भूमिका घबराट टाळण्यास सहाय्यकारी ठरली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif