करोनामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण

0

मुंबई : करोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होत असून गुंतवणुकदारांचे कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.गुरुवारी सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स तब्बल 1700 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सुद्धा 500 अंकांची घसरण झाली आहे.


मार्च 2018 नंतर पहिल्यांदाच निफ्टी 10 हजाराच्या खाली आला आहे. 40 हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्‍समध्ये 33 हजारापर्यंत घसरण झाली आहे. आरबीआयने येस बॅंकेवर निर्बंध घातले आहे. सौदी अरेबिया आणि रशियात तेल दरावरुन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. सेन्सेक्‍सची पडझड होण्यामागे ही सुद्धा दोन प्रमुख कारणे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.