करोनाच्या सर्वांत घातक प्रकाराचा शोध

0

 वाशिंग्टन– अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी करोना विषाणूच्या सर्वांत घातक प्रकाराचा शोध लावल्याचा दावा केला आहे. अमेरिका आणि इटलीतील करोनाबाधितांच्या रक्‍तांचे नमुने या संशोधनासाठी तपासण्यात आले. यात सार्स-कोव-2 विषाणूच्या जनुकीय संरचनेत छोटे बदल झाल्याचे आढळून आले आहे. यामुळेच अमेरिका आणि इटली या दोन्ही देशांत करोना संसर्ग हाताबाहेर गेला.

कॅलिफोर्नियातील स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्युटच्या शास्त्रज्ञांच्या मतांनुसार जनुकीय बदलामुळे सार्स-कोव-2 विषाणूच्या सर्वात धोकादायक प्रकारात स्पाइक प्रोटीनचे प्रमाण चार ते पाच पटीने वाढते. यामुळे विषाणूला मानवी पेशींवर बस्तान बसविणे सोपे जाते. त्याचबरोबर ते अधिक काळासाठी टिकून राहण्यास सक्षम बनतात. शास्त्रज्ञ हॅरून चो यांच्यानुसार सार्स-कोव-2 वरील स्पाइक प्रोटीन एसीई2, श्‍वसनसंस्थेत विषाणूची क्षमता वाढते. हे श्‍वसनसंस्था, फुफ्फूस आणि रक्‍त वाहिन्यांच्या ऊतीत मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे करोना विषाणू फुफ्फुसाला सहज शिकार करू शकतो. अमेरिकेत या विषाणूच्या प्रकाराचा प्रसार युरोपमधून झाल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

विषाणूला नष्ट करणे सोपे नाही 
या संशोधनात असे समोर आले आहे की, सार्स-कोव-2 या विषाणू सर्वाधिक धोकादायक प्रकारातील स्पाइक प्रोटीनची संरचना अतिशय गुंतागुंतीची आहे. यामुळे विषाणूत आढळणारे जीन रबरासारखे काम करू लागतात. त्यामुळे त्यांना औषधाने नष्ट करणे अतिशय कठिण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.