Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»करवंदे येथे वीज पडून दोन बैल ठार
    महाराष्ट्र

    करवंदे येथे वीज पडून दोन बैल ठार

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 6, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    ५ आक्टोबर २०२१ रोजी  सायंकाळी  पाच ते सव्वा पाच  वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटा सह झालेल्या पावसात करवंदे येथे  विज पडून चिंतामण चिमण चव्हाण या शेतकऱ्यांचे दोन बैल शेतातच ठार झाले.  तर एका बैलाला विजेचा जोरदार शाॅक बसला आहे.

    सदर घटनेची  नैसर्गिक आपत्ती विभागाने तात्काळ दखल घेत तहसिलदार राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी कर्मचारी पाठवून माहिती घेतली असून सदर घटना जिल्हाधिकारी  नैसर्गिक आपत्ती विभागास कळविण्यात आली आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण आठरे यांनी  पशुचिकित्सक श्रीकांत  पवार, भावेश देशमुख यांना घटनास्थळी पाठवले. पाहणी केली असता जनावरांच्या तोंडातून फेस बाहेर आला होता. जनावरे परिपूर्ण ताठ पडलेल्या अवस्थेत  पोट फुगून आले होते.

    याबाबत शांताराम पालवे यांने सांगितले की, गावापासून जवळच  खडक उतारा टाकलीच्या शेतात  चार ते पाच शेतकरी बैल चारत होते. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर चंद्रकांत गावित, सोनिराम चव्हाण,  प्रकाश सहारे, बैल मालक चिंतामण चव्हाणांचा नातू  चेतन चव्हाण यांनी लगतच्या एका झापाचा आसरा घेतला. काही क्षणातच लख्ख प्रकाश पडताच कानठळ्या बसवणारा जोरदार आवाज झाला. नेमके काय झाले हे कळेनासे झाले. मात्र चेतनने झापाच्या भिंतीच्या छिद्रातून घटना प्रत्यक्षात बघितली. विज सरळ रेषेत पडल्याने नेमकी दोन ते तीनच बैलावर पडली. तिरप्या दिशेने पडली असती तर सात ते आठ बैल व चार शेतकरी यांच्या जिवावर बेतले असते.

    तलाठी प्रकाश कडाळे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. बैलांचे शवविच्छेदन करण्यात आले असून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी पोलीस पाटील भागवत सहारे, भिका चव्हाण, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif