चाळीसगाव : महाराष्ट्र राज्य दहावी बोर्डाचा निकाल २९ जुलै रोजी जाहीर झाला. त्यात चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांड्यातील आदित्य देवसिंग राठोड या विद्यार्थ्याने ९२.४० टक्के मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.
आदित्य हा आदर्श विद्यामंदिर ,कुळगाव , बदलापूर (पूर्व),ठाणे येथे दहावीचं शिक्षण घेत होता. वडील देवसिंग राठोड हे शिक्षक आहे. शिक्षक असल्याने घरात नेहमी शिक्षणाचा वातावरण असायचं. त्यामुळे हे यश त्याच्या पदरी आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. खरंतर लहानपणापासून आदित्यला वाचण्याचा छंद आहे. त्याच्यात असलेल्या वाचन संस्कृती मुळेच हे सर्व काही घडू शकले. असे मत आदित्य ने व्यक्त केले.