चाळीसगाव ;- बालकांचे आवडते चाचा अर्थातच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हाच बालदिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.त्या अनुषंगाने आज दि.१४ नोव्हेंबर २०२० रोजी जगनभाऊ राठोड प्राथमिक आश्रम शाळा आणि लोकनेते काकासाहेब जी.जी.चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा करगाव ता.चाळीसगाव येथे सकाळी ८.३० वाजता प्राथमिक विभाग मुख्याध्यापक डी.व्ही.पाटील यांचे हस्ते नेहरूजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. माध्यमिक विभाग मुख्याध्यापक व्ही.आर.बोरसे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.सोबतच पर्यवेक्षक एम.एन.आंधळे यांचेसह प्राथमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक सुरेंद्र पाटील, एस.के.राठोड आणि शिपाई ताराचंद सेवा राठोड,संजय भिवसिंग चव्हाण,यशवंत दिलीप चव्हाण आणि भुषण मगर हे या बालदिनानिमित्त अभिवादन सभेस उपस्थीत होते.तसेच दि.८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२० दरम्यान शासनातर्फे जाहीर आवाहन करण्यात आलेल्या बालदिन सप्ताह निमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये करगाव येथील माध्यमिक आ.शा.च्या इ.१० वी तील राणी मनोज जाधव या विद्यार्थीनीने निबंध लेखन , इ.८ वी तील तेजस्विनी नामदेव देवरे या विद्यार्थीनीने स्वलिखित कविता लेखन व सादरीकरण आणि इ.६ वी तील कल्याणी गणेश पाटील हिने वक्तृत्व स्पर्धेत आपल्या घरूनच आँनलाईन यशस्वी सहभाग नोंदवला. एक विशेष की या तिनही स्पर्धेत सहभागी होणेसाठी मुलींनीच अधिक उत्साह दाखवला.महाराष्ट्रातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना लवकरच शासनाच्या शैक्षणिक पोर्टलवर प्रशस्तीपत्र प्राप्त होणार आहे. या विद्यार्थीनींना शाळेतील शिक्षक अनुक्रमे बी.एस.शेख, ए.बी.राठोड आणि पी.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी कलाशिक्षक .डी.यू.चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमाबद्दल सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ,चाळीसगावचे अध्यक्ष जी.जी.चव्हाण, सचिव-मा.राजेश वाडीलाल राठोड,उपाध्यक्ष-मच्छिंद्र राठोड आणि संचालक योगेश चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले .