Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»कमी किंमतीत बाईक खरेदी करायची : तर ‘या’ 5 Bikes तुमच्यासाठी परफेक्ट
    महाराष्ट्र

    कमी किंमतीत बाईक खरेदी करायची : तर ‘या’ 5 Bikes तुमच्यासाठी परफेक्ट

    By April 5, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडले आहे. अशा परिस्थितीत बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की, ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी केला जातो. त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या काही बाईक्सची माहिती देणार आहोत.

    TVS Sport
    या बाईकमध्ये तुम्हाला 109.7 सीसीचं सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड फ्युल इंजेक्ट इंजिन मिळेल, ज्याची 8.29PS इतकी पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. 4-स्पीड गियरबॉक्ससह हे इंजिन सज्ज आहे. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 95 किलोमीटरचं मायलेज देते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 54,850 रुपये ईतकी आहे.

    Bajaj CT100
    या बाईकमध्ये तुम्हाला 99.27cc चं 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल, जे 7500 rpm वर 5.81 kW मॅक्सिमम पॉवर आणि 5500 rpm वर 8.34 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. सोबतच या इंजिनमध्ये तुम्हाला 4-स्पीड गियरबॉक्स मिळेल. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 99 किलोमीटपर्यंतच मायलेज देते. या बाईकची एक्स शोरुम किंमत 47,654 रुपये इतकी आहे.

    Bajaj कडक CT100
    100 CC इंजिन असलेली ‘कडक CT100’ तीन नव्या स्टाइलिश रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ब्लू-एबोनी ब्लॅक, यल्लो-मॅट ऑलिव्ह ग्रीन, रेड-ग्लॉस फ्लेम रेड या तीन रंगांचा समावेश आहे. या बाईकची किंमत 46,432 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे. या कारमध्ये दमदार DTSi इंजिनसह फ्रंट सस्पेंशन बेलोज, रबर टँक पॅड, फ्युल मीटरसारखे आठ नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. कडक CT100 मध्ये 100CC चं दमदार इंजिन आहे, सोबत 4 स्ट्रोक आणि सिंगल सिलेंडर मिळेल. इंजिन 7500 आरपीएम वर 7.9 बीएचपी आणि 5500 आरपीएमवर 8.34 टॉर्क निर्माण करतं. यासोबत या बाईकमध्ये टॉप 4-स्पीड गियरसह 90 KMPL चं मायलेज मिळेल. या बाईकचं फ्रन्ट सस्पेंशन हायड्रोलिक टेलेस्कोपिक आणि स्प्रिंग-इन-स्प्रिंग 100mm व्हील ट्रॅवलचं रियर सस्पेन्शन आहे.

    Honda Livo
    या बाईकमध्ये तुम्हाला 109.51 cc चं एयर कूल्ड, 4 स्ट्रोक SI, BS-VI इंजिन दिलं आहे. या इंजिनमध्ये तुम्हाला 4-स्पीड गियरबॉक्स मिळेल. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये 74 किलोमीटरचं मायलेज देते. Honda Livo ची एक्स शोरूम किंमत 70,059 रुपये इतकी आहे.

    Hero Splendor iSmart 110
    या बाईकची एक्स शोरुम किंमत 67,100 रुपये आहे. BS-VI इंजिन असलेली ही बाईक 75 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif