Sunday, May 29, 2022

कमर्श‍ियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आजपासून  43.5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी हॉटेल व्यावसायिकांना मोठा झटका बसला आहे. नवीन दर आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे आता हॉटेल मधील जेवण महागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नवीन दरानुसार दिल्लीत 19 किलोचे कमर्शियल सिलेंडर 1736.5 रुपयांना झाले आहे. पूर्वी ते 1693 रुपयांना होते. मात्र, घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत न बदलल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. कोलकात्यात 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 1805.5 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी ही किंमत 1770.5 रुपये एवढी होती.

दरम्यान, सप्टेंबरमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या महिन्यात या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या