कबड्डी खेळताना विद्यार्थाचा जमिनीवर कोसळून मृत्यू

0
 पुणे ;- आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत सामन्यादरम्यान एका खेळाडूचा चक्कर येऊन जमिनीवर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पुण्यातील शिक्रापुर येथे घडली आहे. गौरव वेताळ असं या खेळाडूचं नाव असून तो शिक्रापूर येथील नवोदय विद्यालयात सातवी इयत्तेत शिकत होता. गौरवच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना व मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे.
पुण्यातील शिरूर जवळील शिक्रापुर येथील मैदानात आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत गौरव नवोदय विद्यालयाकडून कबड्डी खेळत होता. सामन्यात गौरव उत्तम चढाया करत होता. सामना सुरू असताना गौरव एक चढाई पूर्ण करून त्याच्या संघाकडे परतला त्यानंतर समोरच्या संघातील खेळाडू चढाईसाठी आला. त्यावेळी संघासोबत बचाव करत असतानाच गौरव चक्कर येऊन पडला. काही वेळ तडफडत असल्यासारखे त्याने हातपाय देखील मारले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी व स्पर्धेच्या आयोजकांनी त्याला शिरूरच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गौरवच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच गौरवच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
Leave A Reply

Your email address will not be published.