कबचौ उमवि मधील संवैधानिक पदाची भरती करून, विद्यापीठातील आर्थिक भ्रष्टाचार थांबवा

0

अमळनेर (प्रतिनिधी) : कबचौ उमवि मधील BSNL च्या वायफायची सेवा का घेण्यात आली. किती खर्च त्यासाठी झाला, त्या बाबतचे कागदपत्र निविदा वर्क ऑर्डर आगाऊ अदा केलेल्या रकमेचा तपशील त्यांच्या कार्यालयीन टिप्णिसह आम्हाला मिळावे. तसेच विद्यापीठ मधील परीक्षा विभागाने किती व कोणत्या स्वरूपाचे गोपनीय साहित्य घेतले उदा उत्तरपत्रिका, फर्निचर, केमिकल्स, क्रीडा, साहित्य, विद्यापीठ मधील रद्दी विक्री किती होती ती किती विकली गेली कोण्या संस्थेला विकली किती पेमेंट त्याचे आले.

पेपर सेटिंग,खरेदी संगणक प्रोग्राम करण्यासाठी कोणत्या संस्थेला कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर करार करण्यात आला त्याची कागदपत्र कोणच्या सांगण्यावरून सदर करार केला गेला ह्याच्या कार्यालयाने केलेली टिपणी सह जाहीर करा. तसेच प्र कुलसचिव यांची नियुक्ती कायदेशीर पद्धतीने किती दिवसासाठी करता येते व नंतर ते पद कायदेशीर मार्गाने भरणे कसे व किती दिवसानी कायद्यात अपेक्षित आहे तशी त्यांची नियुक्ती केली का ..त्याना मुदत वाढ देता येते का त्याना वेतन कसे व किती दिले गेले तसा शासनासोबत काय पत्र व्यवहार केला त्याच्या कार्यालयिन टिपणी सह जाहीर करावा तसेच त्यानी कोणत्या कायदेशीर सल्लागार यांचे मत घेवून हे काम केले आहे हे देखील सर्वाना सांगावे तसेच मेनेज्मेंट मधे फक्त ठराव करून नियुक्ती कायम ठेवता येते का तसे अधिकार मेनेज्मेंट ला आहेत असे चुकीचे ठराव करून ओएसडी पद भरले त्याना मानधन विद्यापीठ फंडातूंन दिले गेले आहे.

ते तात्काळ थांबवावे कारण एफएओ हे पद सांभाळणारी व्यक्ती ही कायद्याने त्या पदावर पूर्ण वेळ असणारी असायला हवी असे अपेक्षित असताना नियुक्त व्यक्ती ला त्या पदावर बसवायचे कारण काय हे देखील जाहीर करा तसेच lockdown काळात डेलिविजियस लोकाना वर्क फ्रॉम होम करता येते का त्यानी अश्या किती लोकाना आदेश दिले होते कही लोकांसाठी back dated ठराव का केले गेले जेव्हा विद्यापीठ मधे प्रश्न विचारले जातात.

त्यावेळेस कसे कागदपत्र बदलवून आर्थिक भ्रष्टाचार केले जात आहेत कोणत्या  मेंबर च्या दबावाखाली येवून प्रशासन काम करत आहे. ह्या सर्व बाबीचा खुलासा जाहीर रित्या करावा अन्यथा आम्हास खुल्या चर्चेस कागदपत्र सहित बोलवून भ्रष्टाचार झाला नाही चुकीचे ठराव केले गेले नाहीत. सदर सर्व मुद्दे हे महिती अधिकारात मागविली आहेत परंतु विद्यापीठ सदर महिती देण्यास टाळाटाळ करत असून वेळ काढून आर्थिक भ्रष्टाचार करण्याच्या प्रयत्नात आहे का? तसेच चुकीच्या लोकाना नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने दिल्या गेल्या नाहीत. याबाबत आमच्या आरोपांचे पुराव्या सह खंडन करावे तसे न झाल्यास होणाऱ्या परिणामास व विद्यापीठ सारख्या विद्येच्या पवित्र संस्थेच्या बदनामिस आपण स्वतः प्रशासन जबाबदार राहील व पुढील भ्रष्टाचार संबंधी गुन्हे न्यायालयिन प्रक्रियेने केले जातील असे  राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सचिव जळगाव महानगर अँड कुणाल पवार,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे भूषण भदाणे यानी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.