एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल:-चोपडा हुन कपाशीच्या गाठी भरून व्हाया एरंडोल सेलवास साठी जाणारा दहा टायर ट्रक धरणगाव एरंडोल रस्त्यावर टोळी गावानजीक पलटी होऊन क्लीनर लायक युनूस पिंजारी वय तीस वर्ष हा ट्रक खाली दाबला जाऊन जागीच गतप्राण झाला व ट्रक चालक मनोज श्रावण मराठे ट्रक मालक हितेंद्र परदेशी हे दोघे जखमी झाले ही दुर्घटना शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास टोळी गावानजीक असलेल्या खाजगी रोपवाटिका नजीक घडली.
एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की एरंडोल येथील एम एच १९ झेड ३५९५ क्रमांकाचा दहा चाकी ट्रक चोपडा येथून कपाशीची गाठी भरून धरणगाव मार्गे येत होता टोळी गावापासून थोड्या अंतरावरील रोपवाटिकेचे जवळ समोरून आलेल्या ट्रकने कट मारला असता कपाशीच्या गाठी भरलेल्या ट्रक चालक त्याचा ट्रक वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्या खाली उतरला व त्यात तो पलटी झाला त्यात ट्रक मधील क्लिनर लायक युनुस पिंजारी राहणार कट कर गल्ली एरंडोल हा ट्रक खाली दाबला जाऊन जागीच ठार झाला तर ट्रक चालक मनोज श्रावण मराठे व ट्रक मालक हितेंद्र परदेशी हे दोघे जखमी झाले दोघे जखमींवर एरंडोल येथे खाजगी रुग्णालयात उपचार होत आहे.
याबाबत पोलिस स्टेशनला भाग ५ गु.र.नबर १/२१ ,भादवि कलम ३०४अ,२७९,३३७,३३८, प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विकास देशमुख राजू पाटील संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहेत