Sunday, January 29, 2023

कपाशीचा ट्रक उलटला; १ मजूर ठार तर ८ जखमी

- Advertisement -

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर- जळगाव रस्त्यावर कपाशी भरलेला आयशर ट्रक उलटून झालेल्या अपघातात एक मजुर जागीच ठार तर ८ जण जखमी झाले.

जामनेर- जळगाव रस्त्यावर कपाशीने भरलेला आयशर ट्रक(एम.एच.२८-बी.२७५४) हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ अचानक उलटला. या ट्रकच्या केबीनवर ८ ते १० मजुर बसलेले होते. गाडी उलटुन या मजुरांपैकी समाधान भगवान साबळे (वय ६०) हे गाडीखाली दबल्याने जागीच ठार झाले. तर फिरोज खान नवाब खान, अनिल नामदेव कापसे, युवराज सिताराम कचरे, आकाश रामसिंग राजपुत, गोपाल विष्णु सोनवणे, प्रकाश शामराव माळी, विलास भागवत चौरे, दत्तात्रय शालीग्राम चौधरी हे या अपघातात जखमी झाले असून यापैकी २ जखमी मजुरांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून  पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले.

- Advertisement -

सदर अपघाताची माहिती मिळताच मयत व जखमींना बघण्यासाठी नातेवाईकांनी रूग्णालयात जखमींना उपचारासाठी मदत मिळवण्यासाठी घेतली. याप्रकरणी   जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे