कन्हेरे येथे भरदिवसा फोडले घर : ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास

0

पारोळा :- घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा कपाटातून ५४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना तालुक्यातील कन्हेरे येथे घडली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्हेरे येथील प्रताप पाटील हे एरंडोल येथे कामानिमित्त गेले होते. तर त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून गावातच नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्या पुन्हा घरी आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. तर त्याचवेळी एक तरुण त्यांना गोदरेज कपाट उघडताना दिसला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो जबर झटका देऊन बाहेर लावलेल्या दुचाकीवरुन पसार झाला. घराच्या बाहेर पडणाऱ्या त्या तरुणाच्या खिशात त्यांना पैसे दिसले.  दरम्यान, कपाटात पाहणी केली असता २३ हजार रुपये रोख व सुनेचे ३१ हजार ५०० रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने असा एकूण ५४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल तरुणाने चोरून नेल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत मंगलबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या तरुणाविरुद्ध पाराेळा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जयवंत पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.