भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील कन्हाळा खुर्द गावात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी रविवारी रात्री साडेनऊ वाजता धाड टाकत सहा आरोपींना अटक केली.
यामध्ये जुगार खेळणारे चेतन श्रीराम भील, अनिल बाबुराव सुरवाडे, अन्सार रशीद गवळी, महम्मद पीरू गवळी, इकबाल हुसेन गवळी, पांडुरंग उर्फ पांडा वसंत सुरडकर यांना अटक करण्यात आली असून आरोपींच्या ताब्यातून ५ हजार २०० रुपयांच्या रोकडसह दोन दुचाकी मिळून ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या सहाजणां विरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ ( अ ) , अन्वये तसेच जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून २७०,२७१,१८८ अन्वये तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, भीमदास हिरे, विठ्ठल फुसे, प्रवीण पाटील, रीयाज काझी, होमगार्ड रीतेश सेकोकारे यांनी केली.