कन्नड घाटात कार दरीत कोसळून एक ठार, एक जखमी

0

चाळीसगाव | प्रतिनिधी 

जळगाव येथील तरुण  कन्नड घाटातील खोल दरीत आज दुपारी ५.३० वाजता जळगाव हुन चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जात असतांना लुवी कंपनीची कार क्रमांक एम एच १९ AU ९०६१ घाटाच्या खोल दरीत कोसळल्याने गाडीत बसलेले संतोष शर्मा राहणार आदर्शनगर जळगाव हे जागीच ठार झाले तर चालक चिन्मय पाटील हा गंभीरपणे जखमी झाला आहे घटनास्थळी चाळीसगाव महामार्ग पोलिस कर्मचारी यांनी मृतदेह व जखमीला खोल दरीतून बाहेर काढले व जखमीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे

अपघातानंतर चाळीसगाव येथील महामार्ग पोलिस योगेश बेलदार व विरेंद्र शिसोदे यांनी खोलदरीत उतरुन गंभीर जखमी चालक चिन्मय पाटील यांचे प्राण वाचविले तर मयत संतोष शर्मा यांचा मृतदेह बाहेर काढला त्यांच्या या धाडसी कृत्याने सर्वत्र कौतुक होत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.